gr8 मराठे


देवराई होन , प्रतापराई होन आणि शिवराई होन ही नाणी सोन्यात पाडण्यात आली होती. सर्वच नाण्यावर एका बाजूस ' श्रीराजा शिव ' आणि दुसऱ्या बाजूस ' छत्रपती ' अशी अक्षरे होती. शिवराई नाणे तांब्याचे होते. याशिवाय फलम आणि चक्र
या नावाची दोन नाणी होती. या दोन नाण्यांचे कागदोपत्री उल्लेख वा हिशेब सापडतात. पण प्रत्यक्षात एकही फलम आणि चक्र नाणे अद्याप सापडलेले नाही. या नाण्यांचे एकमेकांशी कोष्टकात नेमके काय नाते होते तेही लक्षात येत नाही.
राज्याभिषेक सोहाळ्यात प्रत्यक्ष वापरलेली सुवर्ण सिंहासनापासून गळ्यातील कवड्याच्या माळेपर्यंत प्रत्येक वस्तूला केवढे ऐतिहासिक मोल आणि महत्त्व आहे! हे महान राष्ट्रीय धन आजपर्यंत प्राणापलिकडे जपले जावयास हवे होते. महाराजांच्या कमरेचा रत्नजडित ' दाब ' म्हणजे कमरपट्टा आजच्या किंमतीने कल्पनेपलिकडचाच ठरावा. इ. १८९० पर्यंत तो अस्तित्त्वातही होता. पण पुढे काय झाले ते इतिहासास माहीत नाही. पण ही सारी राष्ट्रीय संपत्ती आज असती , तर त्यातील प्रेरणा ही अनमोल ठरली असती. आज श्रीमंत महाराज छत्रपती उदयनमहाराज यांनी मात्र अतिशय दक्षतेने शिवछत्रपती
महाराजांची भवानी तलवार , सोन्याचा एक होन , महाराजांचे रोजच्या पूजेतील शिवलिंग (बाण) आणि श्री समर्थ रामदासस्वामींच्या लहान आकाराच्या पादुका राजवाड्यात सांभाळल्या आहेत. तसेच लंडनमध्ये बकींग हॅम पॅलेसमध्ये एक अतिशय मौल्यवान रत्नजडित मुठीची तलवार फारच चांगल्यारितीने ठेवलेली आहे. ती तलवार भवानी तलवार नाही.
तिचे नाव जगदंबा असे आहे. पण तीही तलवार थोरल्या शिवाजी महाराजांचीच आहे , यात शंका नाही. तसेच महाराजांचे पोलादी. वाघनख लंडनमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या वस्तू आणि वास्तू केवढ्या दिमाखात जपल्या जातात हे युरोपिय देशात पाहावे. विशेषत: रशिया आणि इंग्लंडमध्ये हा दिमाख आपल्याला विस्मित
करणारा आहे. लंडनच्या टॉवर ऑफ लंडन या भुईकोट किल्ल्यात इंग्लिश राजा राण्यांचे जडावाचे दागिने आणि वस्त्रे फार फार दिमाखाने ठेवलेली आहेत. आपला कोहिनूर हिरा तिथेच आहे.
...भाग १४८
Read More …

         संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
       शिवछत्रपतींचा पुत्र म्हणून संभाजी राजे छत्रपति झाले. पण हा संभाजी कसा होता अस जर आम्हाला विचराल तर आम्ही दोनच वाक्यात उत्तर देतो, "संभाजी रगेल होते आणि रंगेल होते"अरे ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलुन धरले,
जो मानुस वादलासारखा ह्या दरी सहयाद्रीच्या दरया -खोरयत घोंगावत राहिला अरे १२० लढाया केल्या एकदाही पराभूत न होणारा आणि एकदाही तह करून मागे न फिरनारा राजा म्हणून इतिहासाने ज्याची नोंद घेतली, आणि अखेर त्या औरंगजेबाची कबर इथाच याच परिसरात उभारली गेली त्या संभाजीला आम्ही बदनाम ठरवून टाकले झोपलो होतो आम्ही!!!!! अरे आपण चकचकीत पॉलिशकड़े बघत गेलो, खरया इतिहासाच्या मुळपर्यंत आम्ही गेलोच नाही.
खरा इतिहास आम्हाला कळलाच नाही. कधी तरी पान चालून बघा..कधीतरी समजाउन घ्या संभाजी .
अरे मराठ्यांचा पुत्र असावा कसा हे संभाजीच आम्हाला दाखवतो. १६व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली
हे आम्हाला माहित आहे. पण संभाजीने वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये पहिला ग्रंथ लिहिला हे आम्हाला ठाउक
आसू नये .
Read More …

अमृताहून गोडआशी जीची ख्याती
आहेरोमारोमात मराठ्याच्याभरलेली जीची
व्यापती आहेनशीबवान आम्ही येथे
जन्मलोमातृभाषा आमची मराठी आहेतन
मराठी मन मराठीश्वास मराठी ध्यास
मराठीमराठी जगण्याची शक्ति आहेनशीबवान आम्ही येथे
जन्मलोमातृभाषा आमची मराठी आहेघडविले
जिणे वाढविले जिणेसन्मानने
जगायला शिकविले जिणेआठवणीने
ही जिच्याअद्यान्नापासून पासून
मुक्ती आहेनशीबवान आम्ही येथे
जन्मलोमातृभाषा आमची मराठी आहे
Read More …


अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥


नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥


मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा दिल्लिवर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे
'हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे
म्हनुनच" राजे... पुन्हा जन्म घ्या"!!पुन्हा जन्म घ्या"!!
Read More …

शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे||
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |



शिवरायांचे आठवावे रुप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी॥१॥
शिवरायांचे कैसे बोलणें । शिवरायांचे
कैसे चालणें । शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ॥२॥
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ॥३॥
Read More …

दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा धडाडल्या
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||

वाकुनी आदिलशाहास कुर्निसात देऊनी
प्रलयकाळ तो प्रचंड खान निघे तेथुनी
हादरली धरणी व्योम शेषहि शहारला || १ ||

खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती
उंट हत्ती पालख्या हि रांग लांब लांब ती
टोळधाड हि निघे स्वतंत्रता गिळायला || 2 ||

श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले
रक्त तापले कराल खड्ग सिद्ध जाहले
मर्दनास कालियास कृष्ण सिद्ध जाहला || ३ ||

तुळजापूरची भवानी माय महन्मंगला
राउळात अधमखान दैत्यासह पोचला
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला || ४ ||

सावधान हो शिवा वैर्याची रात्र ही
काळ येतसे समीप साध तूच वेळ ही
देऊनी बळी अजास तोषवी भवानीला || ५ ||
Read More …

इन्द्र जिमि जृम्भा पर
बाडव सअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुल राज है !

पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज हैं !

दावा दृमदंड पर
चीता मृगझुन्द पर
भूषण वितुण्ड पर
जैसे मृगराज हैं !

तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज हैं!!!!!!!!!!!

- महाकवि भूषण
Read More …